स्तोत्रसंहिता ८९:३८-४५
३८
मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात.
३९
तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे.
४०
त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे.
४१
येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो; आणि तो त्याच्या शेजार्यांकरिता घृणापात्र झाला आहे.
४२
तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे.
४३
तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे आणि लढाईत त्याला मदत करण्याचे नाकारले आहे.
४४
तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे आणि त्याचे सिंहासन धुळीत टाकले आहे.
४५
त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. सेला
Settings