Skip to content
स्तोत्रसंहिता ८९:२०-२९

स्तोत्रसंहिता ८९:२०-२९

२०
तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.
२१
माझे बाहू त्याला स्थिर करतील; निश्चितच माझे हात त्याला बळकट करतील.
२२
त्याचे शत्रू त्याला पराजित करू शकणार नाहीत; किंवा दुष्ट लोक त्याला पीडणार नाहीत.
२३
मी त्याच्या शत्रूंना त्याच्यासमोर चिरडेन आणि त्याच्या विरोधकांना नष्ट करेन.
२४
माझी सत्यता व करुणा त्याजबरोबर राहील; माझ्या नावानेच त्याचे शिंग उंचाविले जाईल.
२५
मी त्याला समुद्रावर अधिकार देईन, त्याचा उजवा हात नद्यांवर सत्ता गाजवेल.
२६
तो माझा धावा करून म्हणेल, ‘तुम्ही माझे पिता आहात; तुम्ही माझे परमेश्वर, माझ्या तारणाचा खडक आहात.’
२७
मी त्याची माझा ज्येष्ठपुत्र म्हणून नेमणूक करेन, आणि पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ राजा करेन.
२८
माझ्या करुणामय प्रीतीची छाया त्याजवर सदासर्वकाळ राहील; मी त्याच्याशी केलेल्या कराराचा कधीही अंत होणार नाही.
२९
मी त्याचे वंशज सर्वकाळ सुस्थापित करेन, त्याचे सिंहासन गगनमंडळाच्या अस्तित्वापर्यंत राहील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options