Skip to content
स्तोत्रसंहिता ८८:१४-१८

देव व मनुष्य यांनी सोडून दिलेला

स्तोत्रसंहिता ८८:१४-१८
१४
हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला, आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?
१५
तारुण्यापासून मी दुःखी आणि मरणोन्मुख आहे; तुमच्या भीतीने ग्रस्त होऊन मी असहाय झालो आहे.
१६
तुमच्या क्रोधाने मला ग्रासले आहे. तुमच्या भीतीने माझा विध्वंस झाला आहे.
१७
त्याने दिवसभर जलप्रलयाप्रमाणे सर्व बाजूंनी घेरले आहे. त्याने मला पूर्णपणे गिळंकृत केले आहे.
१८
माझे प्रियजन आणि शेजाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून दूर केले— अंधारच आता माझा घनिष्ठ मित्र झाला आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options