Skip to content
स्तोत्रसंहिता ८२:१-८

स्तोत्रसंहिता ८२:१-८

आसाफाचे एक स्तोत्र. परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:
तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला
दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.
दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.
इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही. ते अंधकारात चालतात; पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.
“मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’
परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल; आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल.”
हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options