स्तोत्रसंहिता ७७:१६-२०
१६
परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले, जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले! त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला.
१७
मेघांनी मुसळधार पाऊस पाडला; मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले; तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले.
१८
चक्रीवादळामध्ये गर्जना झाली; विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले; पृथ्वी थरारली आणि डळमळली.
१९
तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले, तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती; तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता.
२०
मोशे व अहरोन यांच्याद्वारे मेंढरांच्या कळपाप्रमाणे तुम्ही आपल्या लोकांना नेले.
Settings