स्तोत्रसंहिता ७:८-१३
८
याहवेहच, सर्व मानवजातीचा न्याय करोत. माझ्या प्रामाणिकपणानुसार तुम्ही माझे समर्थन करा. हे सर्वोच्च परमेश्वरा! माझ्या धार्मिकतेनुसार माझा न्याय करा.
९
दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.
१०
सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.
११
परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात.
१२
दुष्टांनी आपले मार्ग बदलले नाहीत, तर परमेश्वर आपली तलवार पाजळतील; आपले धनुष्य वाकवून त्याची दोरी ताणली आहे. मन
१३
त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत; आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत.
Settings