Skip to content
स्तोत्रसंहिता ४८:९-१४

स्तोत्रसंहिता ४८:९-१४

परमेश्वरा, तुमच्या मंदिरात, आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो.
१०
हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे.
११
तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत.
१२
सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा.
१३
तिची तटबंदी पाहा आणि तिच्यातील राजवाडे न्याहाळून पाहा, म्हणजे तुम्हाला तिचे वर्णन करून तुमच्या पुढील पिढीला सांगता येईल.
१४
कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options