Skip to content
स्तोत्रसंहिता ४८:१-७

स्तोत्रसंहिता ४८:१-७

एक गीत. कोरहाच्या पुत्रांची एक स्तोत्र रचना. याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.
त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे.
परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे.
ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली, ज्यावेळी ते एकत्र होऊन आगेकूच करीत आले.
त्यांनी हिला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले; भयभीत होऊन त्यांनी पळ काढला.
त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले; स्त्रीला होणार्‍या प्रसूतीच्या वेदनांसारख्या वेदना त्यांना होऊ लागल्या.
पूर्वेकडील वार्‍याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा नाश केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options