स्तोत्रसंहिता ४०:६-१०
६
यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.
७
तेव्हा मी म्हणालो, “पाहा मी येथे आहे, आलो आहे— शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे.
८
हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते; तुमचे नियम माझ्या अंतःकरणात आहेत.”
९
विशाल सभेत तुमच्या तारणाच्या कृत्यांची घोषणा करतो; त्याबाबतीत मी माझे ओठ मुळीच आवरून धरीत नाही, याहवेह हे तुम्हाला माहीत आहे.
१०
हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही, मी तुमचा विश्वासूपणा आणि तुमच्या तारणाच्या मदतीची चर्चा करतो. सर्व मंडळीपासून तुमची प्रीतिपूर्ण दया आणि सत्य ही लपवित नाही.
Settings