स्तोत्रसंहिता २२:३-५
३
तरीपण तुम्ही पवित्र आहात; इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात.
४
तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला; तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले.
५
त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले; तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही.