Skip to content
स्तोत्रसंहिता १८:४६-५०

स्तुतिस्तोत्र व सार्वकालिक करार

स्तोत्रसंहिता १८:४६-५०
४६
याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!
४७
परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात,
४८
ते माझी माझ्या वैर्‍यांपासून सुटका करतात. तुम्ही मला माझ्या वैर्‍यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.
४९
म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी आपल्या नावाची स्तुती गाईन.
५०
ते आपल्या राजाला महान विजय देतात; ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा प्रीती करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options