Skip to content
स्तोत्रसंहिता १८:३२-३६

स्तोत्रसंहिता १८:३२-३६

३२
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
३३
तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात.
३४
ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.
३५
माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे, तुमचा उजवा हात मला आधार देतो; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
३६
माझी पावले घसरू नयेत, म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही मार्ग विस्तृत केला आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options