स्तोत्रसंहिता १८:३२-३४
३२
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
३३
तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात.
३४
ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.