Skip to content
स्तोत्रसंहिता १४७:७-११

निसर्गातील देवाच्या तरतुदीबद्दल स्तुती

स्तोत्रसंहिता १४७:७-११
याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा; वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.
ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात.
ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.
१०
घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही.
११
याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options