Skip to content
स्तोत्रसंहिता १४७:१-६

स्तोत्रसंहिता १४७:१-६

याहवेहचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम, किती यथार्थ आहे!
यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत.
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात, आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.
ते तार्‍यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे.
ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे.
याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options