Skip to content
स्तोत्रसंहिता १४५:१-९

देवाचे थोरपण

स्तोत्रसंहिता १४५:१-९
एक स्तवनगीत. दावीदाची रचना. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन; तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत; त्यांची थोरवी अगाध आहे.
तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्‍या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.
ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन.
ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.
ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील, आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील.
याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.
याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options