स्तोत्रसंहिता १४५:१-७
१
एक स्तवनगीत. दावीदाची रचना. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन; तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
२
प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
३
याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत; त्यांची थोरवी अगाध आहे.
४
तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.
५
ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन.
६
ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.
७
ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील, आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील.
Settings