स्तोत्रसंहिता १२९:५-८
५
सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.
६
घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;
७
कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.
८
येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”
Settings