स्तोत्रसंहिता ११९:११८-१२५
११८
जे तुमच्या नियमापासून पथभ्रष्ट होतात, त्यांना तुम्ही नाकारले आहे, त्यांचा संभ्रम निरर्थक ठरू द्या.
११९
पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तुम्ही एखाद्या गाळाप्रमाणे टाकून देता; म्हणूनच तुमचे नियम मला प्रिय आहेत.
१२०
तुमच्या भीतीने माझा देह थरथर कापतो; मला तुमच्या विधिनियमाचा दरारा वाटतो.
१२१
मी धर्माचरणाने व न्यायीपणाने वागलो आहे; माझा छळ करणार्यांच्या हाती मला सोपवू नका.
१२२
आपल्या सेवकाचे कल्याण सुनिश्चित करा; गर्विष्ठांना माझा छळ करू देऊ नका.
१२३
माझ्या तारणाचे तुमचे नीतियुक्त अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहता माझे डोळे अंधुक झाले आहेत.
१२४
आपल्या प्रेमदयेस अनुसरून तुमच्या सेवकाशी व्यवहार करा आणि मला तुमचे नियम शिकवा.
१२५
मी तुमचा दास आहे; मला विवेकबुद्धी द्या, म्हणजे तुमचे नियम समजतील.
Settings