स्तोत्रसंहिता ११८:१-६
१
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
२
इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
३
अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
४
याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
५
संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
६
याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही; नश्वर मानव मला काय करणार?
Settings