Skip to content
स्तोत्रसंहिता ११६:१२-१९

नवस व सार्वजनिक उपासनेसाठी बांधिलकी

स्तोत्रसंहिता ११६:१२-१९
१२
परंतु याहवेहचे माझ्यावरील सर्व उपकार, मी कसे फेडणार?
१३
मी तारणाचा प्याला उंच करून, याहवेहच्या नावाचा धावा करेन.
१४
मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.
१५
याहवेहच्या दृष्टीने, त्यांच्या निष्ठावानांचा मृत्यू अतिशय मोलवान आहे.
१६
हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे; माझ्या मातेसमान मी देखील तुमची सेवा करेन; मला तुम्ही बंधन मुक्त केले आहे.
१७
मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.
१८
मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.
१९
यरुशलेमात, तुमच्यासमक्ष याहवेहच्या या मंदिराच्या अंगणात ते पूर्ण करेन. याहवेहचे स्तवन करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options