मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०७:१७-२२

रोग्यांचे व पीडितांचे तिसरे उदाहरण

स्तोत्रसंहिता १०७:१७-२२
१७
काही लोकांनी त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे मूर्खपणा केला, आणि त्यांनी केलेल्या पापामुळे ते पीडित झाले.
१८
त्यांना सर्व अन्नाचा तिटकारा वाटू लागला आणि ते मृत्यू दारात पोहोचले होते.
१९
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
२०
ते शब्द मात्र बोलले आणि लोक बरे झाले; परमेश्वराने त्यांना कबरेतून बाहेर काढले.
२१
याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
२२
ते त्याला उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पोत, आणि हर्षगीते गाऊन त्यांच्या कृत्यांचे वर्णन करोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options