मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०७:१०-१६

बंडखोर कैद्यांचे दुसरे उदाहरण

स्तोत्रसंहिता १०७:१०-१६
१०
काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते, लोखंडी साखळदंडांत यातना सहन करणारे बंदिवान होते,
११
कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले.
१२
मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले; ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते.
१३
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
१४
त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले, आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले.
१५
याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
१६
कारण त्यांनीच त्यांचे कास्याचे दरवाजे मोडले, आणि त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकल्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options