स्तोत्रसंहिता १०५:१९-२२
१९
याहवेहने ठरविलेली वेळ येईपर्यंत, त्यांनी दिलेले अभिवचन पूर्णपणे पारखले जाईपर्यंत हे घडले.
२०
मग राजाने त्याला बोलाविणे पाठविले आणि त्याला मुक्त केले, प्रजेच्या शासकाने त्याला सोडविले.
२१
राजाने त्याला महालाचा प्रशासक म्हणून नेमले, सर्व मालमत्तेवर त्याला अधिकार दिला.
२२
त्याच्या राजपुत्रांचा सल्लागार, आणि राजाच्या मंत्र्यांना बोध देण्यासाठी त्याची नेमणूक झाली.
Settings