स्तोत्रसंहिता १०४:१-५
१
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.
२
तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,
३
आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्याच्या पंखावर आरूढ होऊन जातात.
४
ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.
५
तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही.
Settings