स्तोत्रसंहिता १०३:१७-२२
१७
परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.
१८
जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.
१९
याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे, आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे.
२०
अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.
२१
अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो, त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.
२२
त्यांच्या अधिपत्त्यातील अखिल रचनांनो, याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
Settings