Skip to content
नीतिसूत्रे ७:१६-२३

नीतिसूत्रे ७:१६-२३

१६
मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.
१७
ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.
१८
चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!
१९
कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत;
२०
त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.
२१
तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.
२२
जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते
२३
तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options