नीतिसूत्रे ३:१३-१८
१३
ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य.
१४
कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते.
१५
ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही.
१६
तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे; आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत.
१७
तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे.
१८
जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील.
Settings