नीतिसूत्रे २२:१२
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १२ दाखवत आहे.
९
उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.
१०
टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील.
११
जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल.
१२
याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात.
१३
आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!”
१४
वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.
१५
बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
Settings