Skip to content
नीतिसूत्रे २१:१०-१९

नीतिसूत्रे २१:१०-१९

१०
दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात; आणि त्यांच्या शेजार्‍यांवर ते कधीही दया करीत नाहीत.
११
जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो; शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात.
१२
नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात.
१३
जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.
१४
गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते; झग्यात लपवून दिलेला उपहार तीव्र क्रोध शांत करते.
१५
जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. पण दुष्ट कृत्ये करणार्‍यांना ते प्राणसंकटच वाटते.
१६
शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो.
१७
भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही.
१८
दुष्ट नीतिमानांसाठी, आणि विश्वासघातकी सरळ लोकांसाठी खंडणी असतो.
१९
भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options