नीतिसूत्रे २:१-९
१
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,
२
सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील, तुझे मन समंजसपणाकडे लावशील—
३
मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,
४
आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,
५
तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.
६
कारण याहवेह सुज्ञान देतात; त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.
७
नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.
८
कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.
९
तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.
Settings