२२
ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
२३
गरीब दयेसाठी विनवण्या करतो आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो.
२४
ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.