नीतिसूत्रे १६:१०-१५
१०
राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत, आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही.
११
प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत.
१२
राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते.
१३
प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात; जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात.
१४
राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल.
१५
जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे.
Settings