नीतिसूत्रे १:१५-१९
१५
माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;
१६
कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात.
१७
जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!
१८
ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात; ते केवळ स्वतःवरच हल्ला करतात!
१९
गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात, त्या सर्वांचे हे मार्ग आहेत; असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते.
Settings