Skip to content
गणना ३३:५२-५६

गणना ३३:५२-५६

५२
तेव्हा तिथे राहणार्‍या लोकांना तुमच्यापुढून घालवून द्या, त्यांच्या सर्व कोरीव आकृत्या व ओतीव मूर्त्यांचा नाश करा व त्यांची सर्व उच्च स्थाने नष्ट करा.
५३
देशाचा ताबा घ्या व त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्यात वस्ती करावी म्हणून हा देश मी तुम्हाला दिला आहे.
५४
तुमच्या कुळानुसार चिठ्ठ्या टाकून जमीन वाटप करावी. संख्येने मोठ्या असलेल्या गटाला मोठे वतन व लहान गटाला लहान वतन. चिठ्ठीद्वारे जे निघेल ते त्यांचे वतन होईल. तुमच्या पूर्वजांच्या गोत्रानुसार त्याची वाटणी करावी.
५५
“ ‘पण त्या ठिकाणच्या रहिवाशांना तुम्ही जर घालवले नाही, व त्यांना तुम्ही तिथेच राहू दिले, तर ते तुमच्या डोळ्यांना कुसळांसारखे आणि तुमच्या कूशीला काट्यांसारखे होतील. ज्या देशात तुम्ही राहाल त्यामध्ये ते तुम्हाला त्रास देतील.
५६
आणि मग जसे मी त्यांचे करण्याचे योजले आहे, तसे तुमचे करेन.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options