Skip to content
गणना ३०:१६

विधींचा सारांश

गणना ३०:१६
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १६ दाखवत आहे.
१३
तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल.
१४
पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो.
१५
पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.”
१६
पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options