Skip to content
गणना ३:२५-३८

गणना ३:२५-३८

२५
सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,
२६
आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्‍या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी.
२७
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.
२८
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती.
२९
कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.
३०
उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.
३१
कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते.
३२
अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.
३३
महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.
३४
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.
३५
अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.
३६
मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी,
३७
तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्‍या यावर करण्यात आली होती.
३८
मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options