गणना ३:१४-२०
१४
याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले,
१५
“आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”
१६
याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.
१७
लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.
१८
गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.
१९
कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.
२०
मरारीची कुळे: महली आणि मूशी.
Settings