गणना २४:१७-२४
१७
“मी त्याला पाहतो, पण आता नाही; मी त्याला न्याहाळतो, पण जवळ नाही. याकोबातून एक तारा उदयास येईल; इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मोआबाचे डोके व शेथाच्या सर्व लोकांच्या कवट्या चिरडून टाकेल.
१८
एदोम जिंकला जाईल; इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, पण इस्राएल बलवान होईल.
१९
याकोबातून एक अधिकारी येईल आणि नगरातील उरलेल्यांचा नाश करेल.”
२०
नंतर बलामाने अमालेकाला पाहिले व आपला संदेश दिला: “अमालेक सर्व राष्ट्रांमध्ये प्रथम राष्ट्र होते, परंतु त्यांचा शेवट संपूर्ण विनाशात होईल.”
२१
यानंतर त्याने केनी लोकांना पाहिले व आपला संदेश दिला: “तुझे वसतिस्थान सुरक्षित आहे, तुझे घरटे खडकात स्थिर आहे;
२२
तरीही हे केनी, जेव्हा अश्शूर तुला कैद करून घेतील तेव्हा तुझा नाश होईल.”
२३
त्यानंतर त्याने हा संदेश दिला: “हाय हाय! परमेश्वर हे करीत असताना कोण जगू शकेल?
२४
कित्तीमाच्या किनार्यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”
Settings