Skip to content
गणना २३:२५-३०

गणना २३:२५-३०

२५
मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”
२६
बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
२७
नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.”
२८
आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.
२९
बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.”
३०
बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्‍हा व मेंढा अर्पण केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options