गणना २:२५-३१
२५
उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.
२६
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 62,700 होती.
२७
आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे.
२८
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 41,500 होती.
२९
नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.
३०
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 53,400 होती.
३१
दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील.
Settings