गणना १९:२-६
२
“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.
३
ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.
४
त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे.
५
एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी.
६
याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा.
Settings