गणना १८:८-९
८
याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे.
९
जो अग्नीपासून राखला जातो तो अर्पणातील परमपवित्र भाग तुझा व्हावा. परमपवित्र अर्पणे म्हणून ते माझ्यासाठी जे आणतात त्या सर्वांतून, ती अन्नार्पणे किंवा पापार्पणे किंवा दोषार्पणे असो, तो वाटा तुझा व तुझ्या पुत्रांचा आहे.
Settings