गणना १६:४-११
४
जेव्हा मोशेने हे ऐकले, तेव्हा तो पालथा पडला.
५
मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.
६
तर कोरहा, तू आणि तुझ्या सर्व अनुयायांनी असे करावे: धुपाटणे घ्या
७
आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!”
८
मोशे कोरहाला हे सुद्धा म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो आता ऐका!
९
तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय?
१०
त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता.
११
तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings