Skip to content
गणना १६:३१-३५

गणना १६:३१-३५

३१
त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली
३२
आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.
३३
ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले.
३४
त्यांच्या आक्रोशामुळे, “पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील!” असे म्हणत इस्राएली लोक भीतीने ओरडत पळत सुटले.
३५
नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options