नहेम्याह ९:९-१५
९
“इजिप्तमध्ये आमच्या पूर्वजांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्या; तांबड्या समुद्राच्या जवळ त्यांनी केलेला तुमचा धावा तुम्ही ऐकला.
१०
फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे.
११
तुम्ही त्यांच्यासमोर समुद्र दुभागला, म्हणजे त्यांनी कोरड्या जमिनीवरून चालत जावे. परंतु त्यांचा पाठलाग करणार्यांना असे खोलात फेकले, जणू प्रचंड जलाशयात एखादा दगड फेकला जावा.
१२
आमच्या पूर्वजांचे दिवसा मेघस्तंभाद्वारे व रात्री त्यांना आपल्या मार्गाने जाता यावे म्हणून अग्निस्तंभाद्वारे मार्गदर्शन केले.
१३
“तुम्ही सीनाय पर्वतावर खाली उतरले; त्यांच्याशी स्वर्गातून बोलले; त्यांना न्याय्य व योग्य विधी व कायदे दिले आणि उत्तम नियम व आज्ञा दिल्या.
१४
तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र शब्बाथाची ओळख करून दिली व तुमचा सेवक मोशेद्वारे त्यांना आज्ञा, नियम व कायदे प्रदान केले.
१५
ते भुकेले असताना त्यांना स्वर्गातून भाकर दिली आणि तहानलेले असताना खडकातून पाणी दिले; तुम्ही त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी जावे व जी तुम्ही बाहू उभारून वचनदत्त केली होती, त्या भूमीचा ताबा घ्यावा.
Settings