Skip to content
नहेम्याह ८:१३-१८

नहेम्याह ८:१३-१८

१३
महिन्याच्या दुसर्‍या दिवशी सर्व कुलप्रमुख, याजक आणि लेवी नियमशास्त्राचे अधिक काळजीपूर्वकरित्या वाचन ऐकण्यासाठी एज्रा शिक्षकाकडे एकत्र आले.
१४
नियम ऐकत असताना, त्यांच्या निदर्शनास आले ते हे, याहवेहने मोशेला सांगितले होते की सातव्या महिन्यात येणार्‍या मंडपांच्या सणाच्या काळात इस्राएली लोकांनी तात्पुरत्या मांडवात राहावे.
१५
देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”
१६
तेव्हा लोक बाहेर पडले आणि डाहळ्या तोडून आपल्या घरांच्या धाब्यांवर, आपल्या अंगणात, परमेश्वराच्या भवनाच्या अंगणात, जल वेशीच्या जवळील चौकात आणि एफ्राईम वेशींच्या चौकात त्यांनी तात्पुरते मांडव घातले.
१७
या मांडवामध्ये बंदिवासातून परत आलेले सर्वजण सणाचे सात दिवस राहिले. नूनाचा पुत्र येशूआ याच्या काळापासून हा सण इस्राएली लोकांनी अशा प्रकारे साजरा केलेला नव्हता. प्रत्येकाचा आनंद खूप मोठा होता.
१८
सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options