Skip to content
नहेम्याह ६:५-७

नहेम्याह ६:५-७

पाचव्या वेळेला सनबल्लटाचा सेवक हातात तोच निरोप असलेले एक खुले पत्र घेऊन आला.
त्या पत्रात असा मजकूर होता: “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस,
आणि अशी घोषणा करण्यासाठी तू यरुशलेममध्ये संदेष्ट्याची नेमणूक केली आहेस की: ‘यहूदीयामध्ये आता एक राजा आहे!’ ही बातमी राजाकडे जाणार आहे; म्हणून इकडे येऊन या गोष्टी आमच्याशी बोल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options