Skip to content
नहेम्याह ३:६-१२

वायव्य तट: जुन्या दरवाजापासून दरीच्या दरवाजापर्यंत

नहेम्याह ३:६-१२
येशनाह वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले.
त्यांच्या शेजारी, पश्चिम फरातच्या राज्यपालाच्या सत्तेखाली असलेल्या गिबोन व मिस्पाह येथील लोकांनी डागडुजीचे काम केले. गिबोनी मलतियाह व मेरोनोथी यादोन आले होते.
हरहयाहचा पुत्र उज्जीएल व्यवसायाने सोनार होता, त्यानेही पुढच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी अत्तरे तयार करणारा हनन्याह होता. त्यानेसुद्धा डागडुजी केली. या दोघांनी यरुशलेमातील रुंद भिंती पर्यंत डागडुजी केली.
यरुशलेमच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हूरचा पुत्र रफायाहने त्यांच्या शेजारच्या तटाची डागडुजी केली.
१०
हरूमाफाचा पुत्र यदायाहने आपल्या स्वतःच्या घरासमोरील तटाची डागडुजी केली आणि त्याच्या शेजारीच हशबन्याहचा पुत्र हट्टूशने डागडुजी केली.
११
यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली.
१२
त्याच्या शेजारी यरुशलेमच्या दुसर्‍या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी हल्लोहेशचा पुत्र शल्लूमाने व त्याच्या कन्यांनी डागडुजी केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options