Skip to content
नहेम्याह १०:३२-३९

नहेम्याह १०:३२-३९

३२
“प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;
३३
समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे; आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
३४
“आम्ही—याजक, लेवी आणि लोकांनी—लाकडांचा पुरवठा निर्धारित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या की आमच्या प्रत्येक कुटुंबांनी आमच्या परमेश्वराच्या भवनात आणावे जेणेकरून याहवेह आमच्या परमेश्वराच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे लाकूड आणायचे आहे.
३५
“प्रत्येक पिकाचा व प्रत्येक फळझाडाचा पहिला उपज दरवर्षी याहवेहच्या भवनामध्ये द्यावा अशी जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
३६
“नियमांत लिहिल्यानुसार, प्रथम जन्मलेला पुत्र व आमच्या गोठ्यातील व कळपातील जनावरांचे प्रथमवत्स, परमेश्वराच्या भवनामध्ये सेवा करणाऱ्या याजकांकडे आम्ही ते सादर करू.
३७
“याशिवाय आमच्या परमेश्वराच्या भवनातील कोठारासाठी याजकाकडे प्रथम दळलेले पीठ, आमचे धान्यार्पण व फलार्पण, नवा द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलाचा पहिला हिस्सा आणू. आम्ही आमच्या प्रत्येक उत्पन्नाचा एक दशांश लेव्यांना देण्याचे वचन दिले, कारण आम्ही जिथे काम करतो त्या सर्व नगरातून दशांश जमा करण्याची जबाबदारी लेव्यांची होती.
३८
लेवी दशांश गोळा करीत असताना, त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील एक याजक असावा व लेव्यांनी दशांशाचा दशांश परमेश्वराच्या भवनामध्ये समर्पित करून मंदिराच्या कोठारात जमा करावा.
३९
इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options